जर्मनी मध्ये कमी फी मध्ये शैक्षणिक संधी उपलब्ध

सिंधुदुर्गच्या सुपुत्राची ‘एज्युब्रॉड’ संस्था करते सर्वतोपरी मदत

पत्रकार परिषदेत संचालक राहुल नाईक यांची माहिती

कुडाळ : कोकण सह संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांसाठी जर्मनीमध्ये अतिशय कमी फीमध्ये शासनाच्या विविध योजना अंतर्गत विविध कोर्सेस उपलब्ध असून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फक्त या ठिकाणच्या पालक आणि मुलांची जर्मनीमध्ये जाण्याची तयारी महत्त्वाची आहे. परदेशात नोकरीच्या अनेक संधी आहेत, त्याचा लाभ येथील युवा, तरुणांनी घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेत एज्युब्रॉड एज्युकेशन अँड करियर गायडन्स सेंटरचे (Edubroad Education and Career Guidance Centre) प्रमुख राहुल नाईक यांनी केले. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यासह सिंधुदुर्गातील मुले सुद्धा या एज्युब्रॉड माध्यमातून या ठिकाणी शिक्षण आणि रोजगार च्या संधी घेत आहेत
   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील राहुल नाईक या युवा उद्योजकाने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांना मार्गदर्शन मिळावे व सिंधुदूर्ग मधील मुले मुली देखील युरोप मध्ये शिक्षण घेण्यास येऊदेत म्हणून Edubroad Education and Career Guidance Centre – बर्लीन या नावाने  स्वतःची ६ वर्षांपूर्वी संस्था सुरू केली. याबाबतची माहिती  येथील स्पाइस कोंकणच्या राजवाडा दालनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उद्योजक ऍड श्रीनिवास नाईक सौ स्नेहा नाईक, सौ श्रुती नाईक आदी उपस्थित होते
   यावेळी बोलताना राहुल नाईक म्हणाले, युरोप मधल्या देशातील विविध अभ्यासक्रमांसाठी येणाऱ्या भारतीय मुलांसाठीच ही संस्था काम करते.भारतीय विद्यार्थ्यांना योग्य युनिव्हर्सिटी निवडून देणे, योग्य तो कोर्स निवडणे, व्हिसा करणे, युरोप मध्ये राहण्यासाठी पूर्ण मार्गदर्शन करणे अशी विविध कामे या संस्थेमार्फत केली जातात. जर्मन आणि फ्रेंच भाषा बोलायचे क्लासेस पण सुरू केले आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना इथे कसलीच अडचण येणार नाही. हे क्लासेस ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. आपण स्वतः  गेली १५ वर्षे बर्लिन (जर्मनी) येथे राहत आहे . स्वतः  ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची मास्टर्सची डिग्री येथे संपादित केली आणि नोकरी सुरू झाली. परदेशात आल्यावर विद्यार्थ्यांना खुप अडचणीना सामोरे जावे लागते तसेच तिथे शिकायला येताना पण असंख्य गोष्टींची परिपूर्णता करण्याची गरज असते, आणि त्यासाठी अचूक मार्गदर्शनच उपयोगी पडते. जर हे नीट नाही झाले तर विद्यार्थी हतबल होऊन जातो. परक्या देशात कुणी मदत देखील करत नाहीत.असे श्री. नाईक म्हणाले.
आपल्या बांधवांची अशी कुठलीच अडचण होऊ नये या विचाराने  श्री. नाईक यांनी स्वतःची संस्था सुरू केली आणि आजपर्यंत हजारो विद्यार्थी संस्थेमार्फत इथे युरोप मधल्या विविध देशांमध्ये आनंदाने उच्च शिक्षण घेत आहेत. त्याची हि संस्था फक्त उच्च शिक्षणच नाही तर उच्च शिक्षित मुलांना युरोप मधल्या देशातील अनेक संस्थांमध्ये जॉब्स देण्याची पण कामे करते. श्री. नाईक म्हणतात, जेव्हा जर्मनी येथे शिक्षण घेण्यास आलो , तेव्हा प्रत्यक्षात काय प्रॉब्लेम्स येतात हे त्यांच्या चांगलेच लक्षात आले, आणि तसे इतर मुलांना त्रास होऊ नयेत हा संकल्प मनात धरून  ही संस्था सुरू केली आहे. अशा प्रकारच्या करिअर मार्गदर्शन करणाऱ्या संस्था भारतात अनेक ठिकाणी फक्त मोठ्या शहरांमधून आहेत जसे पुणे, मुंबई, पण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांना मार्गदर्शन मिळावे व सिंधुदूर्ग मधील मुले मुली देखील युरोप मध्ये शिक्षण घेण्यास येऊदेत म्हणून २ वर्षांपूर्वी आपली सिंधुदूर्ग शाखा सुरू केली आहे.त्या आधी  कोल्हापूर येथील शाखा पण कार्यरत आहे, असे श्री. नाईक यांनी सांगितले.
श्री. नाईक पुढे म्हणाले, आपल्या जिल्ह्यातील १५ पेक्षा जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एनरोल झाले आहेत व त्यांनी जर्मनी मध्ये उच्च शिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक लक्ष आणि जिव्हाळा आपल्या घरापासून खुप दूर येवून मिळत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे पूर्ण लक्ष दिले जाते, त्यांना काही अडचणी तरी येत नाहीत ना याकडे आम्ही स्वतः लक्ष देतो एवढ्या वरच न थांबता  जर्मन आणि फ्रेंच भाषा बोलायचे क्लासेस पण सुरू केले आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना इथे कसलीच अडचण येणार नाही. हे क्लासेस ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत आणि हे लँग्वेज ट्रेनिंगचे काम राहुल यांची पत्नी श्रुती नाईक करते.
    दर्जेदार शिक्षण, सांस्कृतिक समृद्धी आणि वाढीव करिअरच्या संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परदेशातील शिक्षण हा एक परिवर्तनकारी अनुभव म्हणून उदयास आला आहे. जगभरातील विद्यापीठे विविध अभ्यासक्रम आणि अत्याधुनिक संशोधन संधी देत ​​असल्याने, परदेशात शिक्षण घेणे हे अनेक इच्छुक विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे. युनायटेड स्टेट्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि जर्मनी सारखे देश आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वोच्च गंतव्यस्थानांमध्ये स्थान देतात. याबाबत बोलताना राहुल नाईक म्हणाले आमच्या सेवांमध्ये करिअर समुपदेशन, अर्ज सहाय्य, आर्थिक मदत आणि बजेट एक्सप्लोर करण्यात मदत, निवास आणि नेटवर्किंगसह आम्ही प्रवासाचा समन्वय साधतो,  त्यांना साइटवरील प्रशासकीय बाबी आदी साठी एज्युब्रॉड मार्गदर्शन करते, असे श्री. नाईक शेवटी म्हणाले.

error: Content is protected !!