आचरा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा आगळा वेगळा उपक्रम

आचरा-अर्जुन बापर्डेकर

              फेसकाॅम या महाराष्ट्रातील रजिस्टर संघटनेशी संलग्न असलेल्या ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशी या ज्येष्ठांच्या संघा मार्फत पूर्वी कार्यरत असलेल्या पण आता वयोमानानुसार कार्यक्रमाना  येऊ न शकणारया सभासदांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांसोबत त्यांचा शाल श्रीफळ गुलाबपुष्प देऊन  सत्कार करण्यात येतो. गेल्या महिन्यात पिरावाडी येथील श्री पराडकर गुरुजींचा तर या महिन्यात आचरा  बाजारपेठ येथील डॉ अनंत भांगले उभयतांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी उपाध्यक्ष सुरेश गांवकर, सचिव जे एम फर्नांडिस, खजिनदार प्रकाश पुजारे विषेश मार्गदर्शक   बाबाजी भिसळे महिला आघाडी प्रमुख श्रीमती फाटक आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!