रत्नागिरीत ठाकरे शिवसेनेला भाजपा नेते मंत्री नितेश राणे यांचा जोरदार दणका

नाचणे जिल्हा परिषद गटातील शाखा प्रमुख, महिला आघाडी प्रमुखांचा भाजपात प्रवेश

रत्नागिरीत ठाकरे शिवसेनेला भाजपा नेते मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जोरदार दणका दिला असून रत्नागिरी शहरा नजिकच्या नाचणे जिल्हा परिषद गटातील ठाकरे सेनेच्या अनेक शाखाप्रमुख महिला प्रमुखांनी भाजपा मधे आज प्रवेश केला.
नाचणे जिल्हा परिषद गट हा ठाकरे सेनेचा एकेकाळी बालेकिल्ला मानला जायचा. मात्र भारतीय जनता पक्षाची सुरू असलेली घोडदौड आणि भाजपा नेते ना. नितेश राणे यांच्या आश्वासक नेतृत्वावर विश्वास ठेऊन तेथील उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. ना. राणे यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
रत्नागिरीतील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी संदीप सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली नाचणे जिल्हा परिषद गटातील उबाठा गटातील महिला आघाडी,पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा गट समावेश होत. त्यामध्ये विशाल औधकर (शाखाप्रमुख वॊर्ड क्र.३) श्री सुमित पारकर (शाखाप्रमुख वॊर्ड क्र.४), देवराज सुर्वे (उपविभाग प्रमुख,युवासेना) सौ.आश्विनी शेलार (महिला आघाडी,शाखा संघटक वॊर्ड क्र.५, सौ.प्रमिला ठिक (महिला आघाडी, उपविभाग संघटक, माजी ग्रामपंचायत सदस्य), सौ.मंजिरी चव्हाण, (महिला आघाडी, उपशाखा संघटक), सौ.सुमन घाणेकर (गटप्रमुख), सौ.श्रेया धनोकर (गटप्रमुख) यांच्यासह सौ.किरण हातखंबकर, सौ.अनघा मोरे, सौ.माधुरी तिवारी, सौ. संध्या चवंडे, सौ.पूजा ठिक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यानी प्रवेश केला.

error: Content is protected !!