कणकवली शहरातील महामार्गाचे खड्डे बुजवा, अन्यथा स्वखर्चाने बुजवणार!

कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांना इशारा
आज रविवारी रात्रीपर्यंतची दिली डेडलाईन
पालकमंत्री नितेश राणे यांचे देखील वेधणार लक्ष
कणकवली शहरात महामार्गाच्या सर्विस रस्त्यांना भले मोठे खड्डे पडले असून हे खड्डे आज रात्रीपर्यंत बुजवा अन्यथा महामार्ग प्राधिकरण जनतेची कामे करू शकत नसल्याने मी स्वखर्चातून हे खड्डे उद्या सोमवारी सकाळी बुजवणार असा इशारा कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महामार्ग प्राधिकरण चे अभियंता श्री. साळुंखे यांना दिला आहे. कणकवली शहरात गेले अनेक दिवस महामार्गाच्या सर्विस रस्त्यांना भले मोठे खड्डे पडले असून हे खड्डे बुजवण्यासाठी महामार्ग प्राधिकरण चा दुर्लक्ष होत आहे. काही दिवसांपूर्वी काही खड्ड्यांना तात्पुरते स्वरूपात पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले. परंतु हे पुन्हा खड्डे जैसे ती स्थितीत झाले आहेत. दरम्यान येत्या काळात गणेश चतुर्थी जवळ येत असेल गणेश चतुर्थी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असतात. कणकवली हे बाजारहाटाचे प्रमुख केंद्र असून आसपासच्या गावांना कणकवली ही मुख्य बाजारपेठ आहे. असे असताना महामार्ग प्राधिकरणाने हे खड्डे स्वतःहून बुजवण्याची गरज होती. परंतु महामार्ग प्राधिकरण अद्याप या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने हे खड्डे रात्रीपर्यंत बुजवा अशी मागणी श्री नलावडे यांनी केली आहे. तसेच आज रात्री पर्यंत खड्डे बुजवले न गेल्यास पालकमंत्री नितेश राणे यांचे या बाबत लक्ष वेधणार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या सोयीसाठी स्वखर्चातून हे खड्डे बुजविले जाणार. महामार्ग प्राधिकरण आज रात्रीपर्यंत हे काम मार्गी लावू न शकल्याने स्वखर्चातून शहरातील सर्विस रस्त्यांचे खड्डे बुजविण्याची वेळ येणार असे श्री नलावडे यांनी सांगितले.