स्पृहा राणे आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर चमकणार

२९ जुलै रोजी स्पृहा राणे व सौ.सोनाली पारकर सिंधुदुर्ग मधून मलेशियासाठी रवाना

भारतातून ३५ मुलांची निवड : सिंधुदुर्गातील ७ मुलांचा समावेश

एड्युस्मार्ट इंक कणकवली अबॅकस ऍक्टिव्हिटी सेंटरकडुन कु.स्पृहा विजय विनया राणे(इयत्ता सहावी) हिची मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गणित आणि मानसिक अंकगणित स्पर्धेसाठी(आयएएमए) २०२५ साठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. एड्युस्मार्ट इक ओरोस आणि सावंतवाडी सेंटरवरूनही इतर मुले मलेशियासाठी रवाना होत आहेत.
ही स्पर्धा दि. २ ऑगस्ट रोजी जोहर बाहरू, मलेशिया येथे होणार आहे. भारताकडुन एकुण ३५ मुलांची निवड झाली असून जगभरातून विविध देशातील २००० मुले या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
कु. स्पृहा हिने अॅबॅकस या अंकगणित विषयाचे प्रशिक्षण कणकवलीतील एड्युस्मार्ट ऍक्टिव्हिटी सेंटरच्या संचालिका सौ. सोनाली श्रीकृष्ण पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहे. एड्युस्मार्ट ऍक्टिव्हिटी सेंटर २०१७ पासून कणकवली सिव्हील कोर्टाशेजारी, बिजलीनगर येथे कार्यरत आहे.
कु. स्पृहाच्या या कामगिरीसाठी सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!