निवृत्त कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता व शाखा अभियंता यांना दिले प्रशिक्षण

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोकण प्रादेशिक विभागामार्फत सहाय्यक अभियंता, शाखा अभियंता यांना निवृत्त कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्याकडून आज मुंबई सार्वजनिक बांधकाम विभाग भवन येथे प्रशिक्षण देण्यात आलं. यावेळी ग्रीन बिल्डींग या विषयावर अभियंता वर्गशी सखोल चर्चा केली तसेच पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून सर्वांनी सर्वोतपरी काळजी घेण्यात यावी, तसेच प्रत्येक अभियंता यांनी राष्ट्राच्या हितासाठी काम केले पाहिजे. तसेच कितीही खडतर परिस्थिती आली तर खचून न जाता नव्या उमेदीने काम करत राहणे गरजेचे आहे. प्रामाणिक काम कराल तर नक्कीच यश तुमच्यासोबत राहील असं प्रशिक्षण दरम्यान सर्वगोड यांनी सांगितले.

निवृत्त झालो तरी देश हिताची भावना माझ्या मनात आहे. आणि राष्ट्रहितासाठी नेहमी झटत राहील समाज हिताची कामे माझ्या हातून व्हावी हीच माझी शेवटपर्यंत इच्छा असल्याचेही सर्वगोड यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!