विद्यूत मंडळ ॲक्शन मोडवर आचरा परीसरात लाईन सफाईची कामे जोरात अधिवेशनात आमदार निलेश राणे यांची उपस्थिती केलेल्या वीज समस्यांचीच हि परिणीती ग्रामस्थांमधून समाधान

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आचरा परीसरातील विद्यूत लाईनला लागणारी झाडी साफसफाई करण्याचे काम विद्यूत मंडळाने युद्ध पातळीवर सुरू केल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या वीज प्रश्नाचीच हि परीनिती असल्याचे मत ग्रामस्थांमधून व्यक्त केले जात आहे.
गेल्या कित्येक काळापासून झाडीत गुरफटलेल्या विद्यूत लाईन मुळे सोसाट्याच्या वा-या पावसात ग्रामीण भागात वीजेचा लपंडाव सुरू होत असे.यामुळे ग्रामस्थांना व्यावसायिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता.लाईन सफाई बाबत वारंवार विद्यूत मंडळाला ग्रामस्थांकडून सूचित केले जात होते.मात्र याबाबत कार्यवाही होताना दिसत नव्हती.आमदार निलेश राणे यांनी
महाराष्ट्र विधिमंडळच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात कोकणातील विजेच्या गंभीर समस्यांबाबत संपूर्ण आकडेवारीसह आक्रमक शैलीत अभ्यासपूर्ण मांडणी करताना सभागृहात वीज प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नाची गांभीर्याने दखल ऊर्जा विभागाने घेतली असल्याचे ग्रामीण भागात विद्यूत मंडळाकडून सुरू केलेल्या कामावरून दिसून येत आहे.ऐन गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर वीज समस्या उद्भवणा-या बाबींवर विद्यूत मंडळाकडून कार्यवाही सुरू झाली आहे.कार्यतत्पर आमदार निलेश राणे यांच्या मुळेच या गोष्टींना गती मिळाल्याचे बोलले जात आहे.
आमदार निलेश राणे यांच्या रूपाने लोकांच्या समस्यांबाबत विधानसभेत आवाज उठविणारा आणि समस्यांची पुर्तता करणारा आमदार लाभल्याचे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!