माताच आपल्या मुलाच भवितव्य घडवू शकते- जेरॉन फर्नांडिस सरपंच आचरे कै.बा.ना बिडये विद्यालय, केंद्रशाळा आचरे नंबर १ मध्ये निपुणमाता पालक पूर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न

मातेचे ममत्व खूप महत्त्वाचे आहे. आई म्हणजे वात्सल्य, प्रेम, आणि ममतेचं प्रतीक. ती मुलांसाठी आधारस्तंभ असते. तीच आपल्या मुलाचे भवितव्य घडवू शकते असे मत आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी व्यक्त केले.
कै बा.ना बिडये विद्यालय, केंद्र शाळा आचरे नंबर १ येथे निपुण भारत या उपक्रमा अंतर्गत माता पालक मेळावा व उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते मार्गदर्शन करत होते.यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर ,उपसरपंच संतोष मिराशी, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दिक्षित केंद्रप्रमुख राजेंद्रप्रसाद गाड , मार्गदर्शक नागेश कदम ,मुख्याध्यापिका अनिता पाटील ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, किशोरी आचरेकर, चंद्रकांत कदम उपशिक्षिका शारदा बिसेन, दिपाली खंडगावकर पदवीधर शिक्षक सिद्धेश हळवे, मीरा बांगर तसेच शाळा व्यवस्थापन समिती माता-पालक संघ शिक्षक पालक संघ यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.
.कार्यक्रमासाठी एकूण 85 माता पालक उपस्थित होते.
माता पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून नागेश कदम सर प्राध्यापक सुनिता देवी अध्यापिका विद्यालय मालवण यांनी बालकाच्या सर्वांगीण विकासात मातांची भूमिका (NEP 2020) या विषयावर पौराणिक काळापासून आधुनिक युगा पर्यन्त विविध दाखले देत पालकांच्या भावविश्वात जात सहज सोप्या भाषेत नवीन अभ्यासक्रमाच्या अपेक्षा पालकांपर्यन्त पोचवल्या तसेच गटसाधन केंद्र मालवण च्या विषय तज्ञ श्रीम आरती कांबळी यांनी निपुण माता NEP 2020 नुसार व निपुण भारत उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये माता पालकाची भूमिका व कर्तव्य याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले.
केंद्र शाळा आचरे नंबर १ च्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर पदवीधर शिक्षक हळवे यांनी सूत्रसंचालन केले.

error: Content is protected !!