पालकमंत्र्यांना एक मेसेज आणि काम तडीस

पालकमंत्री नितेश राणे यांच्या तत्परतेचे आणखी एक उदाहरण

व्हॉट्सॲपला एक मेसेज आणि काम पूर्ण;ग्रामस्थांकडून आभार

पालकमंत्र्यांना एक मेसेज आणि काम तडीस अस सध्या सिंधुदुर्गात वातावरण आहे.मिठबाव येथील रस्त्याचे उदाहरण ताजे असतानाच आणखी एक किस्सा घडलाय. देवगड तालुक्यातील आरे गावात गेल्या सहा महिन्यांपासून मोबाईलला फोरजी(4g) सेवा मिळत नव्हती.अनेक प्रयत्न करून झाल्यावर पालकमंत्र्यांना व्हॉट्सॲपला फक्त एक मेसेज केला आणि कालपासून गावात फोरजी सेवा सुरू झाली.पालकमंत्र्यांच्या या तत्परतेमुळे ग्रामस्थांकडून आभारा बरोबरच समाधान व्यक्त केले जात आहे.

सर्वसामान्यांना मंत्री किंवा पालकमंत्री यांच्यापर्यंत आपली समस्या मांडणे तसे कठिणच असते.मात्र सिंधुदुर्गात परिस्थिती वेगळी आहे.पालकमंत्री नितेश राणे साध्या मेसेजवर ही अपेक्षीत काम पूर्ण करतात,लोकांची गा-हानी ऐकतात त्यामुळे जनमानसात पालकमंत्र्यांबद्दल एक वेगळी भावना निर्माण होत आहे.आमदार म्हणून नितेश राणेंनी मतदारसंघातील जनमानसांची मने जिंकलीच होती मात्र आता पालकमंत्री म्हणून दमदार कामगीरी करून सर्वांची वाहवा मिळवत आहेत.पालकमंत्री कसा असावा तर तो सर्वसामान्यांची गाऱ्हाणी ऐकणारा,त्यांना वेळ देणारा,संकटात धावून येणारा, मदत करणारा अर्थात नितेश राणेंसारखा अशी आता लोकांची भावना आहे.

देवगड तालुक्यातील आरे गावात सहा महिन्यांपासून मोबाईल टॉवरची फोरजी सेवा बंद आहे. सर्वसामान्यां बरोबरच विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत होता.यासाठी अनेकदा अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्या मात्र काहीच फरक पडला नाही.अखेर पंचायत समितीचे माजी सदस्य अजित कांबळे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना व्हॉट्सॲपवर मेसेज केला.आणि जे सहा महिन्यात घडलं नाही ते घडून गेल.कालपासून गावात फोरजी सेवा सुरू झाली.यामुळे ग्रामस्थ आनंदून गेले असून पालकमंत्र्यांचे सोशल माध्यमांवर आभार मानत आहेत.

error: Content is protected !!