टोपीवाला ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिका सौ.सुविधा नरेंद्र तिनईकर यांची 36 वर्षाची प्रेरणादायी सेवा पूर्ण

टोपीवाला हायस्कूलच्या मध्यवर्ती सभागृहात 30 जून रोजी सेवानिवृत्ती पर सत्कार समारंभ आणि निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

टोपीवाला ज्यूनिअर कॉलेजच्या व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट च्या शिक्षिका सौ. सुविधा नरेंद्र तिनईकर यांनी 36 वर्षाची प्रेरणादायी सेवा पूर्ण करत 30 जून रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्या निमित्ताने टोपीवाला हायस्कूलच्या मध्यवर्ती सभागृहात मालवण एज्युकेशन सोसायटी तर्फे त्यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ आणि निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. वळंजू सर यांनी केले. त्यांनी तिनईकर मॅडमच्या कार्याचा आढावा घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर सौ. तांबे मॅडम, सौ. रावराणे मॅडम,सौ. धामापूरकर मॅडम, सौ. करंजेकर मॅडम , पर्यवेक्षक श्री वेरलकर सर यांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्याबद्दलचा आदर व प्रेम व्यक्त केले.
मालवण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मॅडमच्या प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांना मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन तसेच शाळा कॉलेजच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे मॅडमचे सर्व बॅचचे माजी विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थानी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित केले. त्यानंतर मालवण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. विजय कामत, शालेय समिती अध्यक्ष श्री. शैलेश खांडाळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सौ तिनईकर मॅडम यांनी या सत्काराला उत्तर देताना शाळेत नोकरीसाठी रुजू झाल्यापासून आतापर्यंतच्या गोड आठवणीना उजाळा दिला. मॅडम बोलत असताना खूप भाऊक झाल्या.
या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतील 1989 च्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांपासून अनेक माजी वि‌द्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय विविध क्लबचे सदस्य, पदाधिकारी , पत्रकार तसेच सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मयूरा भिसे तर आभार सौ. अपूर्वा देसाई यांनी मानले.

error: Content is protected !!