वाघेरीत ठाकरे शिवसेना चीतपट, सरपंचांसहित, उपसरपंच व सदस्य भाजपा मध्ये

पालकमंत्री नितेश राणेंनी केले भाजपा मध्ये स्वागत
कणकवली तालुक्यातील वाघेरी गावातील ठाकरे युवासेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्या व गावच्या सरपंच सौ. अनुजा राणे यांचा समावेश असून, उपसरपंच व इतर पदाधिकारीही भाजपमध्ये सहभागी झाले आहेत.
या प्रवेश वेळी महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रवेशामुळे वाघेरीत ठाकरे सेनेला मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
या वेळी वाघेरी गावच्या सरपंच सौ. अनुजा अनंत राणे, उपसरपंच स्नेहल मंगेश नेवगे, सदस्य निधी नितीन राणे, युवासेना उपतालुका प्रमुख व माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाघेरकर, माजी सदस्य मंगेश नेवगे, जयश्री वाघेरकर, संचालक गोपाळ कदम, तसेच निलेश वाघेरकर, राजेश कदम, रामदास कदम, एकनाथ वाघेरकर, दिनेश पेडणेकर, सुरेश कदम, साई नेवगे, संजय कदम, सिद्धेश कदम, संकेश कदम, मुकेश कदम, प्रवीण गुरव, सिद्धेश मोंडकर, अक्षय कदम, अमित पेडणेकर, सुलोचना वाघेरकर, चैताली कदम, शीतल कदम, दिव्या पेडणेकर, चैत्राली कदम, चित्रांगी कदम व सुवर्णा कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी भाजपचे विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, मंडळ अध्यक्ष श्री. मिलिंद मेस्त्री, श्री. दिलीप तळेकर, श्री. पंढरी वायंगणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रवेशामुळे वाघेरी गावात भारतीय जनता पक्षाची संघटना अधिक मजबूत झाली असून, तालुक्यातील राजकीय समीकरणांवर याचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.