प्रसिद्ध वास्तूतज्ज्ञ मा. मधुकर लाड यांच्या कडून न्यू इंग्लिश स्कूल, आचरामधील विद्यार्थ्यांना वह्यावाटप.

आचरा-अर्जुन बापर्डेकर
प्रसिद्ध वास्तूतज्ज्ञ मधुकर लाड यांनी आपल्या मातोश्री कै. शशिकला भगवान लाड यांच्या स्मरणार्थ न्यू इंग्लिश स्कूल, आचरामधील इ.९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांना ८० डझन वह्यां उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते केले गेले. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणारया लाड यांच्या दातृत्वाबद्धल विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर वैभवशाली रामेश्वर पतसंस्थेचे चेअरमन मंदार सांबारी, माजी केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, देवस्थान ट्रस्टचे कपिल गुरव, मधुकर लाड यांचे बंधू प्रकाश लाड, प्रशालेचे मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक अंकुशराव घुटुकडे यांसह अन्य शिक्षक आदी उपस्थित होते.
यावेळी मंदार सांबारी व प्रसाद चिंदरकर यांनी मधुकर लाड यांचे सामाजिक कार्य, आपल्या शाळा व गाव याबद्दलची कृतज्ञता याबद्दल गौरवोद्गार काढले.





