तळाशील वासीयांच्या मदतीला आमदार निलेश राणे सरसावले

स्वखर्चाने बंधारा उभारण्याच्या कामाला सुरुवात
तळाशील बंधारा नसलेल्या किनारपट्टीभागाची धूप मोठ्या प्रमाणात होत असून मुख्य रस्त्यासह लगतच्या घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांना फोनवरून संपर्क केल्यावर तळाशील ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी तातडीने स्वखर्चाने बंधारा बांधण्याच्या सुचना केली.याचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत तळाशील जेष्ठ नागरिक जयहरी कोचरेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, आचरा सरपंच जेराॅन फर्नांडीस ,दिपक पाटकर, तोंडवळी माजी सरपंच संजय केळूस्कर, संजय तारी, तसेच जयप्रकाश परुळेकर, चंदू कदम,अजित घाडी,यांसह तळाशील ग्रामस्थ उपस्थित होते.
एकाबाजूला खाडी आणि दुस-या बाजूला समुद्र असलेल्या तळाशील भागाला
पौर्णिमेच्या उधाणापासून बंधारा नसलेल्या किनारपट्टी भागाची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. समुद्र आणि मुख्य रस्त्यापर्यंत चे अंतर काही फूटांपर्यंतच येवून ठेपले आहे. धूप अशीच होत राहिल्यास तळाशील मुख्य रस्ता खचून तळाशील भागाचे दोन भाग होण्याची स्थिती निर्माण झाली आहे याबाबत तळाशील ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना माहिती देताच दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्याशी संपर्क साधताच गांभीर्य ओळखून आमदार निलेश राणे यांनी तळाशील भागाच्या सुरक्षेसाठी तातडीने स्वखर्चाने बंधारा उभारण्याच्या सुचना दत्ता सामंत यांना दिल्या. त्यानुसार बुधवार पासून बंधारा उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली. याबाबत माहिती देताना दत्ता सामंत यांनी सांगितले की