काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते विकास सावंत यांचे दुःखद निधन

सिंधुदुर्गातील एक काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते आणि राणी पार्वती देवी विद्यालय सावंतवाडी या विद्यालयाचे अध्यक्ष विकास सावंत यांचे थोड्या वेळापूर्वी दुःखद निधन झाले आहे… काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होते… काँग्रेसची जिल्हा परिषदेमध्ये सत्ता असताना वित्त व बांधकाम सभापती पद त्यांनी सांभाळत जिल्हा परिषदेवर आपली छाप उमटवली होती… मंत्री कै.भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र म्हणून त्यांचा परिचय होता… काँग्रेसमध्ये अनेक पदे त्यांनी भूषवली होती. जिल्हा बँकेचे संचालक पदी ही त्यांनी अनेक वर्ष काम केले होते.. उबाठा शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख विक्रांत सावंत यांचे ते वडील होत… सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी आणी दोडामार्ग तालुक्यात शिक्षण क्षेत्रात मध्ये जाळे पसरण्याचे मोठे काम त्यांनी केले होते. ते शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहिले…त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे…