मंत्री नितेश राणेंमुळे चर्मकार समाजाची विकासकामे लागतील मार्गी – संजय कदम

चर्मकार समाजाच्या विविध संघटना पदाधिकाऱ्यांचा भाजपात पक्षप्रवेश

राज्याचे मत्स्योद्योग, बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून चर्मकार समाजबांधवांची प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लागतील. नामदार नितेश राणे यांची विकासाभिमुख कार्यपद्धती सर्वश्रुत आहे. गावागावातील चर्मकार समाजाची स्मशानशेड, समाजमंदिर यासारखे मूलभूत प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. चर्मकार समाजासाठी असलेल्या विविध योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावीपणे करून समाजहित साधण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे नेहमीच आमच्या समाजासोबत राहतील हा विश्वास असल्यामुळे भाजपात पक्षप्रवेश केल्याचे संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र राज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय उर्फ छोटू कदम यांनी सांगितले. नामदार नितेश राणे यांच्या हस्ते ओम गणेश बंगल्यावर संजय कदम यांच्यासह चर्मकार समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रविवार 13 जुलै रोजी भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. संजय कदम यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाला समर्थन देत भगीरथी भोईर प्रतिष्ठान महाराष्ट्र चे अध्यक्ष दिनेश भोईर यांनीही यावेळी भाजपात प्रवेश केला. संजय कदम यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ चे कणकवली तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण, युवा संकल्प प्रतिष्ठान चे अध्यक्ष आनंद जाधव, अमित चव्हाण सांगेली, संदीप चव्हाण म्हापण, प्रशांत निरवडेकर, अरुण चव्हाण,अमोल चव्हाण,दीपक परब, योगेश परब, सागर चव्हाण,प्रवीण कदम, सीताराम जाधव, राजू आंब्रडकर, दीपेश चव्हाण, संतोष जाधव, सॊ.मयुरी चव्हाण, सुजाता कदम, स्मिता चव्हाण, प्रियांका कदम,प्रिया निरवडेकर, काजल कदम, प्रशांत फोंडेकर,प्रशांत जाधव,अनिरुद्ध जाधव,विशाल कदम,अरुण चव्हाण आंबोली, प्रसाद चव्हाण आदींनी भाजपात पक्षप्रवेश केला.

error: Content is protected !!