घरफोडी प्रकरणात आंतरराज्य टोळीच्या दोन चोरट्यांना बेंगलोर मधून अटक

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई
सिंधुदुर्गा सहित राज्यभरातील घरफोड्यांची प्रकरणे उघडकीस येणार
सावंतवाडी येथे अज्ञात आरोपींनी श्रमविहार कॉलनी येथील घरामध्ये अनधिकृत प्रवेश करुन घरफोडीचा प्रयत्न केला. तसेच लक्ष्मीनगर येथील घरासमोरील एक मोटार सायकल व वेलनेस रिसॉर्ट समोरील मोटार सायकल व तेथील दोन मोबाईल चोरी करुन निघुन गेलेले होते. घटनास्थळी दोन पाळ कोयते मिळून आलेले होते. यावरुन सावंतवाडी पोलीस ठाणेत गु. रजि. नं. 129/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), 305(व), 331(3), 331(4), 62, 324(4), 324(5), 126(2) अन्वये गुन्हा दाखल करुन नमुद गुन्हयाचा तपास सांवतवाडी पोलीस ठाणे करीत होते. नमुद आरोपींचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्याबाबत आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करीत असताना संशयीत आरोपीत हे कोल्हापुर ते कर्नाटक असे प्रवास करुन बेंगलोर या ठिकाणी गेले बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकाला गोपनीय माहिती समजून आली. त्याप्रमाणे मा. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तात्काळ बेंगलोर राज्य कर्नाटक येथे रवाना केले.
दिनांक 12.07.2025 रोजी बेंगलोर इलेक्ट्रीक शहरातील कामासंद्रा भागात लपुन बसलेले दोन संशयीत आरोपी मिळुन आले त्यांना ताब्यात घेवुन सावंतवाडी पोलीस ठाणे येथे आणुन चौकशी केली असता संशयीतांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच नमुद संशयीतांकडे अधिक चौकशी करता ते मोहोळ, जि. सोलापुर येथील असल्याचे समजले. त्यांना सदर गुन्ह्याकामी अटक करण्यात आलेली आहे.
आरोपींतांना यापुर्वी महाराष्ट्र राज्यातील विवीध जिल्ह्यात 30 ते 35 गुन्हयांमध्ये अटक करण्यात आलेली असुन महाराष्ट्र, गोवा व कनार्टक राज्यात ते अनेक गुन्हयात पोलिसांना पाहिजे असलेले आरोपी असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
नमुद दोन्ही आरोपी हे घरफोडी व चोरीचे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी संघटीत टोळीच्या मार्फत महाराष्ट्र गोवा व कर्नाटक राज्यात गुन्हा केल्याचे दिसुन येते. त्यामुळे नमुद दोन्ही आरोपी यांना महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांकरीता त्यांचेकडील दाखल गुन्हयांत आवश्यकता असल्यास सिंधुदुर्ग पोलीस विभागाशी संपर्क करण्यास कळविण्यात आलेले असुन सदर गुन्हयांचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई डॉ. श्री. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, नयोमी साटम, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, विनोद कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक, प्रविण कोल्हे, अमोल चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक जे.ए. खंदरकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल- डॉमनिक डिसोझा, सदानंद राणे, बस्त्याव डिसोझा व जॅक्सन घोन्साल्वीस पोलीस अंमलदार प्रथमेश गावडे, धनश्री परब व युवराज भंडारी यांनी केलेली आहे.