अखेर दाखले मिळण्याचा मार्ग झाला मोकळा, सर्वर डाऊन ची समस्या सुटली!

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडून कणकवली तहसीलदार कार्यालयात दाखल्यांकरिता नियोजन
कणकवलीचे माजी नगरसेवक अभय राणे यांनी वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष
जिल्हाधिकाऱ्यांकडून महा आयटी शी संपर्क
गेले दोन दिवस सर्वर डाऊन असलेल्या कारणामुळे कणकवली तहसीलदार कार्यालयातील ठप्प झालेली ऑनलाइन दाखल्यांची सेवा अखेर आज मंगळवारी दुपारपासून सुरू झाली. याबाबत कणकवली चे माजी नगरसेवक अभय राणे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला होता. त्यानंतर या संदर्भात प्रशासकीय पातळीवर हालचाली झाल्या. तसेच जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी तहसीलदार कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना देखील या संदर्भात फोन करत माहिती घेतली. व अखेर मंगळवारी दुपारी ही सेवा सुरू झाली. त्यानंतर कणकवली तहसीलदार कार्यालयात काल सोमवारी मंगळवारी दोन दिवसांच्या दाखले व प्रमाणपत्रांकरिता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली. तसेच त्यांनी या व्यवस्थेचा आढावा देखील घेतला.
ऑनलाइन दाखल्यांची सेवा सर्वर डाऊन झाल्याने ठप्प झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. यामुळे ऑनलाईन दाखले वितरित करणे व त्या अनुषंगाने कार्यवाही करणे अडचणीचे जात होते. दरम्यान आज मंगळवारी याबाबत कणकवली चे माजी नगरसेवक अभय राणे यांनी तहसीलदार श्री. देशपांडे यांची भेट घेत चर्चा केली. तसेच याबाबत पालकमंत्री यांच्या कार्यालयाशी संपर्क साधत सदर समस्या मांडली. यानंतर काही वेळातच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत कार्यवाही च्या सूचना देण्यात आल्या. त्या त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महाआयटी शी संपर्क साधत याबाबत समस्या मांडली व त्यानंतर काही वेळातच सर्वर सुरळीत सुरू झाल्याने दाखल्यांसाठीचे अर्ज व त्या अनुषंगाने कागदपत्र स्वीकारून ते ऑनलाईन करण्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली. परंतु गेले दोन दिवसात ही सेवा ठप्प झाल्याने कणकवली तहसीलदार कार्यालयात सेतू सुविधा केंद्र मध्ये मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नायब तहसीलदार मंगेश यादव यांनी येथील लोकांशी संवाद साधत सोमवारी व मंगळवारी अशा दोन दिवसाच्या स्वतंत्र लाईन करून प्रतिज्ञापत्र करणे व अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी अन्य नागरिकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला. ऑफलाइन दिलेल्या दाखल्यांवर बारकोड व ऑनलाइन क्रमांक येत नसल्याने हे दाखले ऑफलाईन देता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.