श्वेता सतीश सामंत हिचा सीए परीक्षेत यश मिळविल्या बद्दल कणकवली माजी नगराध्यक्ष व भाजप मार्फत सत्कार

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

नुकत्याच झालेल्या (ICAI) institute of charted account ) म्हणजे सी ए च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण होत पदवी मिळविल्या बद्दल कणकवली शहरातील मधलीवाडी येथील श्वेता सतीश सामंत हिचा कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देत तिच्या घरी जाऊन सत्कार केला. यावेळी कणकवली चे माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, माजी नगरसेवक बंडू गांगण, विलास राणे आदी उपस्थित होते. खचून न जाता श्वेता हीने जिद्द व कसोटी बाळगत अभ्यास करून या परीक्षेमध्ये यश मिळवले. याबद्दल समीर नलावडे व पदाधिकाऱ्यांनी तिचे कौतुक केले.

error: Content is protected !!