केंद्र सरकारच्या खासगीकरण व कामगार कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व पदाधिकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी
केंद्र सरकारने काढलेल्या खासगीकरण आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनेने आज दि 9 जुलै रोजी भारत बंद ची घोषणा केली आहे. यामध्ये बँकिंग सेवा, विमा कंपन्या, पोस्ट ऑफिस, सरकारी बस, सरकारी कारखाने, कंपन्याचे उत्पादन या सर्व कामगारांनी भारत बंद ची घोषणा करून आंदोलन करत सरकारने खासगीकरण थांबवावे व कामगारांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली आहे.
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, बाळू मेस्त्री, राजू राठोड, धीरज मेस्त्री व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र बँक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट देत आंदोलनात सहभागी झाले. यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी कामगार एक जुटीचा विजय असो, आवाज दो हम एक है, कामगार कायद्यामधील बदल रद्द करा-रद्द करा, बँक कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाढलीच पाहिजे अश्या घोषणा दिल्या. या केंद्र सरकारच्या खासगीकरण व कामगार कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 20 हजार कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत.तर या बंदमध्ये देशभरातील 25 कोटी कामगार या भारत बंद मध्ये रस्त्यावर उतरणार आहेत.यावेळी सुशांत नाईक म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्व कामगार संघटनेच्या पाठीशी आहे. केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी धोरणं आखली जात असून त्यामुळे कामगार, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप यावेळी नाईक यांनी केला.