कणकवली पटवर्धन चौकातील अनधिकृत पार्किंग वर दंडात्मक कारवाई

पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली वाहतूक पोलिसांकडून कारवाई
कणकवली पटवर्धन चौकामध्ये नेहमीच वर्दळ असताना देखील चौकातच अनधिकृतपणे वाहने पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक हवालदार विनोद चव्हाण व दिलीप पाटील यांनी ही कारवाई केली. यामध्ये वाहतुकीस अडथळा, दुचाकी वर ट्रिपल सीट, लायसन सोबत नाही, फॅन्सी नंबर प्लेट या च्या 20 केसेस परत एकूण 16 हजार 500 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.