कलमठ वीज पुरवठ्यातील उच्चदाबा मुळे उपकरणांचे नुकसान

ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी
कलमठ येथील काही भागांत वारंवार होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या उच्च दाबामुळे अनेक नागरिकांचे विद्युत उपकरणे जळून खराब होत आहेत. नुकतेच प्रसाद सुरेंद्र मुसळे यांच्या घरातील विजेच्या अधिक दाबामुळे वायरिंग,पंप, CCTV कॅमेरा, LED बल्ब यांसारखी उपकरणे खराब झाली. त्यांनी या संदर्भात महावितरण सहाय्यक अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य श्री. धीरज मेस्त्री यांनी सांगितले की, ज्या नागरिकांचे अशा प्रकारे नुकसान झाले असेल त्यांनी ग्रामपंचायतमध्ये किंवा महावितरण कार्यालयात अर्ज करून नुकसान भरपाईसाठी पुढाकार घ्यावा.
तसेच, अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक घरात RCCB (Residual Current Circuit Breaker) किंवा ELCB (Earth Leakage Circuit Breaker) बसविणे अत्यंत गरजेचे आहे.
ELCB/RCCB हे उपकरण घरातील वीज पुरवठ्यात कोणतीही गळती (leakage) किंवा अचानक वाढलेला दाब आल्यास वीज पुरवठा तात्काळ बंद करते. त्यामुळे आग लागणे, शॉक लागणे किंवा उपकरणांचे नुकसान होणे टाळता येते.
आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी त्वरित ELCB/RCCB बसवा आणि विजेचे उपकरणे सुरक्षित ठेवा, असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी केले आहे.