खासदार अरविंद सावंत यांनी केले संदेश पारकर यांचे सांत्वन

संदेश पारकर यांच्या वडिलांचे निधन झाल्याने घेतली भेट

खासदार व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र अरविंद सावंत यांनी आज मंगळवारी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. संदेश पारकर यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी आज ही भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, युवा सेना समन्वयक तेजस राणे, सौरभ पारकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!