श्वेता सतीश सामंत हिचे सीए च्या परीक्षेमध्ये उज्वल यश

श्वेता हीच्यावर सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव
नुकत्याच झालेल्या ICAI (Institute of Chartered Accountants of India) सीए च्या परीक्षेमध्ये कणकवली येथील श्वेता सतीश सामंत अव्वल गुण मिळवत उत्तीर्ण होत तिने सीए ही पदवी मिळवली आहे. मे 2025 मध्ये तिने सीए ची परीक्षा दिली होती. त्यानंतर नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये तिने उज्वल यश संपादन केले आहे. श्वेता हिचे कुटुंबीय हे मूळ कणकवली तालुक्यातील हरकुळ बु. येथील व गेली अनेक वर्षे कणकवली शहरातील मधलीवाडी येथे स्थायिक झाले आहेत. श्वेता सामंत ही कणकवलीतील सामंत इलेक्ट्रॉनिक्स चे मालक कै. सतीश उर्फ बंडू सामंत व प्राथमिक शिक्षिका स्नेहा सामंत यांची मुलगी आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.