“यशस्वी भव देवा भाऊ” माजी आमदार प्रमोद जठारांचे सिंधुदुर्ग मधील बॅनर चर्चेत

ठाकरेंच्या मुंबईतील एकत्र येण्यानंतर जठारांची बॅनरमधून टोलेबाजी

मुंबईमध्ये नुकताच दोन्ही ठाकरेंचा एकत्रित येत मेळावा झाला. या मेळाव्या दरम्यान राज व उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले व त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप व राजकीय टोलेबाजी देखील रंगली. परंतु या सर्वांमध्ये ठाकरेंच्या मेळाव्या एवढी चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय धुरंधरपणा यादरम्यान महाराष्ट्राने पाहिला व अनुभवला देखील. दस्तूरखुद्द राज ठाकरे यांना देखील हे भाषणामध्ये मान्य करावे लागले व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना जे जमलं नाही ते फडणवीसनी करून दाखवलं अशा शब्दात राज ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या. या साऱ्या पार्श्वभूमीवरच सिंधुदुर्गात कणकवली मध्ये माजी आमदार प्रमोद जठार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची चुणूक दाखवणारे तसेच शिवसेना ठाकरे गट व मनसेला डिवचणारे बॅनर लावले आहेत . सध्या हे बॅनर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहेत . या बॅनर मध्ये म्हटले आहे, “सभा त्यांची चर्चा तुमची, भेट त्यांची, आशीर्वाद तुम्हाला, आता मराठी परप्रांतीय, राजकारण त्यांचे, मते मात्र तुम्हालाच, यशस्वी भव देवा भाऊ, हा महाराष्ट्राच्या जनतेचा शब्द”! अशा शब्दात माजी आमदार प्रमोद जठार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करणारे बॅनर लावले आहेत. तर एक प्रकारे दोन ठाकरे एकत्र येऊन देखील चर्चा मात्र फडणवीस यांची झाल्याचे या बॅनर द्वारे म्हणत त्यांनी दोन्ही ठाकरेंना देखील डीवचण्याचा प्रयत्न केला आहे.

error: Content is protected !!