चिंदर लब्देवाडी येथे घरावर झाड पडून नुकसान

चिंदर लब्दे वाडी येथील अनिल वसंत लब्दे यांच्या घरावर शनिवारी पहाटे जंगली झाड पडून छप्पराचे सुमारे तीस ते चाळीस हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
चिंदर लब्दे वाडी येथील अनिल लब्दे आपल्या पत्नीसह राहतात.शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास वादळी वाऱ्याने घरा लगतचे जंगली झाड घरावर पडले. मोठा आवाज झाल्याने लब्दे गडबडून जागे झाले. सुदैवाने घराच्या जेवण करण्याच्या भागावर झाड पडल्याने लब्दे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. खबर मिळताच
तलाठी आकाश कराळे व पोलीस पाटील सौ सोनाली माळगांवकर यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

error: Content is protected !!