श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालयातर्फे ग्रंथप्रदर्शन आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

शेतीविषयक आधूनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने शेतीविषयक पुस्तकांचे प्रदर्शन आणि
पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती व्हावी म्हणून गेली नऊ वर्षे सतत वृक्षारोपण आणि ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करणा-याश्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा तर्फे शनिवारी शेती विषयक पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन तसेच कार्यकारिणी सदस्या श्रीम. वैशाली सांबारी तसेच कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांच्या परस बागेत सोनचाफा,आणि नारळ रोपांचे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. सदर वृक्षारोपण संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन मंदार सांबारी,
यशराज चे अध्यक्ष श्री. मंदार सरजोशी, सांस्कृतिक समिती सदस्या वर्षा सा़बारी, श्रदधा महाजनी, स्वामी रामेश्वर उद्योग चे सचिन गुळगुळे, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी सुभाष सांबारी,वाचनालयाचे कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, सहकार्यवाह सौ उर्मिला सांबारी, कार्यकारिणी सदस्या श्रीमती वैशाली सांबारी,भिकाजी कदम,ग्रंथपाल सौ विनिता कांबळी,महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.