झाड पडल्याने कणकवली शहरात घराचे नुकसान

नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झाड हटवले

कणकवली शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गणपती साना परिसरातील चौंडेश्वरी मंदिर नजीक असलेल्या नयन सुतार यांच्या घरावर झाडाची मोठी फांदी पडल्याने सिमेंटचे पत्रे फुटून नुकसान झाले. तसेच घराच्या बाहेर लावलेल्या दुचाकीचेही नुकसान झाले. ही घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेची माहिती मिळताच नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. कर्मचाऱ्यांसह तेथील उपस्थित नागरिकांनी घरावर पडलेल्या झाडाच्या फांद्या बाजूला केल्या.या घटनेमुळे सुतार कुटुंबियांचे नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!