जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही – धोंडी चिंदरकर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त चिंदर ग्रामपंचायत व माय माऊली गृप चिंदर कडून विद्यार्थ्यांचा गुणगौरव
राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत चिंदर व माय माऊली ग्रुप चिंदर यांच्या संयुक्त विद्यमाने चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात इयत्ता दहावी व इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. चिंदर गावातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण साठ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प, पेन, भेटवस्तू देऊन यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले की, आपण गावातल्या लोकांच्या सहकार्या मुळेच इथं पर्यंत मार्गक्रमणा केली आहे. आपल्याकडे चिकाटी आणि जिद्द असेल तर आपल्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कोणतेही सहकार्य हवे असल्यास कधीही हाक मारा आपण आपल्या साठी कधीही उपलब्ध आहोत. शिक्षण घेऊन आपण खूप मोठे झाला तरी समाजाशी आपली बांधिलकी कायम ठेवा तसेच व्यसना पासून आपण दूर रहा असाही सल्ला यावेळी चिंदरकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कोणतेही काम कमी नाही मेहनत करा यश आपसूकच आपल्याकडे चालत येईल असं प्रकाश मेस्त्री तर कार्यक्रमाची उमेद घेऊन मार्गक्रमण करा आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवा असे माजी कृषी अधिकारी संजय गोसावी विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन करताना म्हणाले. मालवण पंचायत समिती माजी कृषीअधिकारी तसेच रत्नागिरी येथून सेवा निवृत्त गटविकास अधिकारी संजय गोसावी व चिंदर ग्रामपंचायत नुतन ग्रामपंचायत अधिकारी भगवान जाधव यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सानिका चिंदरकर, दिनेश पाताडे, चिन्मयी पाताडे, स्वरा चिंदरकर, समृध्दी अपराज, प्रतिक्षा पालकर, सर्वेश अपराज, ओल्विन फर्नांडिस, संतोष अनंत अपराज, सोहम चिंदरकर, विराज सावंत, विघ्नेश भरतू, संतोष अपराज, राजाराम केळसकर, बाळा चव्हाण, अनिल लब्दे, साधना पाताडे, दिव्या गोसावी, प्रिया पालकर, दिगंबर जाधव, विश्राम माळगावकर, रणजीत दत्तदास, समीर अपराज, रोशनी फर्नांडिस, रोहित पाटील, तुषार पवार, आशा सेवीका, अंगणवाडी सेविका, माय माऊली गृप सदस्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि समारोप ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर यांनी केले.