ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे मध्ये ऑलिंपिक दिन उत्साहात.

कणकवली/मयूर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,प्रत्येक वर्षी 23 जून रोजी जगभर ऑलिंपिक चळवळीची आठवण म्हणून ऑलिंपिक डे साजरा केला जातो. Move Learn and discover या घोषवाक्याच्या आधारावर शारीरिक स्वास्थ्य क्रीडा आणि सांघिकतेच्या विकासासाठी विविध उपक्रम घेण्यात येतात.
,यावेळी मुलांसाठी मॅरेथॉन चे आयोजन केले होते,यामध्ये
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत जोशात आणि शिस्तबद्ध सहभाग घेतला त्याचप्रमाणे या मॅरेथॉन मध्ये प्रशाला क्रीडाशिक्षक श्री.योगेश सामंत सर तसेच श्री.हेमंत पाटकर सर सौ.नेहा मसूरकर मॅडम सहभागी झाले होते.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तयेशेटे सर, उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर, कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल सर , सचिव प्रा. हरिभाऊ भिसे सर, सहसचिव प्रा.निलेश महेंद्रकर सर, खजिनदार सौ शीतल सावंत मॅडम ,सल्लागार श्री.डी.पी.तानावडे सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.