श्री.गांगेश्वर सेवा मंडळ मुंबई , (रजि.) नडगीवे- गावठणवाडी तर्फे शैक्षणिक साहित्य वितरण व दत्तक विद्यार्थी योजना कार्यक्रम नडगीवे नं.१ प्रशालेत संपन्न

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१ या प्रशालेत श्री.गांगेश्वर सेवा मंडळ मुंबई (रजि.)नडगिवे- गावठणवाडी तर्फे शैक्षणिक साहित्य वितरण व ‘सुभाष मण्यार’ स्मृतिप्रित्यर्थ दत्तक विद्यार्थी योजना कार्यक्रम संपन्न झाला तसेच नडगिवे नं.१ या प्रशालेतील आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला.सामाजिक सेवाभाव जपत गेली १५ वर्ष हे मंडळ अविरतपणे नडगिवे पंचक्रोशीतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुखकर व सहज व्हावा, उत्तम शैक्षणिक गुणवत्ता साधावी यासाठी हे मंडळ सेवाभावी वृत्तीने कार्य करत आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांची नेत्रदीपक वाटचाल सुरू आहे. आत्तापर्यंत जवळपास ३५० विद्यार्थी या मंडळाने दत्तक घेतलेले आहेत. हे सर्व विद्यार्थी आज विविध स्तरावरील उच्च शिक्षण घेत आहेत.
याप्रसंगी मान्यवरांनी या मंडळाचे भरभरून कौतुक केले. आपण राबवत असलेले उपक्रम अतिशय स्तुत्य व लोकोपयोगी आहेत. अशा शब्दांत भावना व शुभेच्छा मान्यवरांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून मान.सौ.प्राची ईसवलकर (सरपंच-खारेपाटण) सौ. माधवी मण्यार (सरपंच नडगिवे) श्री. भूषण कांबळे (उपसरपंच) श्री.राजेश वारंगे (ग्रामपंचायत सदस्य)श्रीम.अनिता पाटकर (मुख्याध्यापक)श्रीम.होनगुंटे ( मुख्याध्यापक नडगिवे नं.2 ,श्री.जितेंद्र मण्यार (पोलीस पाटील) श्री.सतीश कर्ले(अध्यक्ष शाळा व्यव.समिती ) श्री.अरुण कर्ले( माजी सरपंच) श्रीम.साक्षी आंबेरकर( उपाध्यक्ष व्य.स.)श्री. किशोर मण्यार (अध्यक्ष गांगेश्वर सेवा मंडळ) श्री. महेश मण्यार (सेक्रेटरी) श्रीम.प्रभा अकिवाटे, संदीप कदम (शिक्षक )तसेच गांगेश्वर सेवा मंडळाचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील पालक वर्ग व ग्रामस्थ, विद्यार्थी बहुसंख्य उपस्थित होते.