ना.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित खारेपाटण प्रा.आ.केंद्र व एस टी बसस्थानक ठिकाणी शोभिवंत झाडांचे वाटप

महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये व सतीश गुरव यांच्या संयुक्त विद्यमाने व रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांचे सौजण्याने प्रा.आ.केंद्र खारेपाटण व एस टी बस स्थानक खारेपाटण यांना आवारात लावण्यासाठी शोभिवंत झाडांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला खारेपाटण माजी सरपंच श्री रमाकांत राऊत,सामाजिक कार्यकर्ते श्री संकेत शेट्ये,भाजप शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल,भाऊ राणे,सौ उज्ज्वला चिके,रोटरी क्लब चे सदस्य व खारेपाटण हायस्कूल मुख्याध्यापक श्री संजय सानप, परवेझ पटेल,संकेत लोकरे,संतोष रोडी,राज गुरव,आदित्य शेट्ये, खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रिया वडाम,आरोग्य सहाय्यक के एस वानोळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सदर शोभिवंत झाडे खारेपाटण एस टी बस स्थानक आवारात व खारेपाटण प्रा.आ.केंद्र येथे ठेवण्यात येनार असून येथील परिसराच्या सौंदर्यात यामुळे अधिक भर पडणार आहे.एस टी वाहतूक नियंत्रक कार्यालय खारेपाटण व प्रा.आ.केंद्र खारेपाटण यांच्या वतीने श्री संकेत शेट्ये व श्री सतीश गुरव आणि रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

error: Content is protected !!