खारेपाटण येथे महाआरोग्य शिबिर संपन्न

ना.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा चे कार्यकर्ते रमाकांत राऊत यांचे आयोजन

महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त खारेपाटण हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ येथील भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी सरपंच श्री रमाकांत राऊत व अथायू हॉस्पिटल कोल्हापूरचे डॉ.ऋषिकेश घाटगे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.
खारेपाटण हायस्कूल येथे घेण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिराचे आयोजन भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच खारेपाटण गावचे माजी सरपंच श्री रमाकांत राऊत व रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष श्री दयानंद कोकाटे,सेक्रेटरी श्री अजय गुरसाळे,तसेच नडगिवे गावच्या सरपंच श्रीम.मण्यार, कुरंगवणे सरपंच श्री संतोष ब्रम्हदंडे,शेर्पे सरपंच सौ स्मिता पांचाळ,खारेपाटण सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश गुरव श्री संकेत शेट्ये,खारेपाटण हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री संजय सानप, पर्यवेक्षक श्री संतोष राऊत, खारेपाटण ग्रा.पं.सदस्य सौ मानली होनाळे,भाजप महिला कार्यकर्त्या सौ उज्ज्वला चिके,श्री विजय सावंत अरुण कर्ले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तर या शिबिराला अथायू हॉस्पिटल कोल्हापूरचे डॉ.ऋषिकेश घाटगे,डॉ.अंकित गुप्ता,डॉ.योगेश जाधव श्री उदय सुर्यवंशी तसेच विवेकानंद नेत्र रुग्णालय कणकवली च्या डॉ.प्राची चव्हाण,श्री रमेश जगदाळे,श्रीम परब,याबरोबरच खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.पेडणेकर मॅडम, खारेपाटण डॉक्टर क्लब असोसिटचे डॉ.उमेश बालन,डॉ वडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी शिबिरात सहभागी रुग्णाची मोफत तपासणी केली.व काही आजरा विषयी मार्गदर्शन केले.
तर या शिबिराला संजय सानप सर,श्री कोकाटे सर,श्री मंगेश गुरव,श्रीम मण्यार यांनी शुभेछा दिल्या.तर अथायू हॉस्पिटल कोल्हापूर चे डॉ.ऋषिकेश जाधव यांनी महाआरोग्य शिबिराला मार्गदर्शन करताना नागरिकांना उद्भभवणाऱ्या विविध आजाराविषयी सखोल माहिती दिली.तसेच या आरोग्य शिबिराचा फायदा तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना व्हावा.तसेच त्यांच्यात आढळून येणाऱ्या गंभीर आजाराचे निदान होऊन त्यांच्यावर तत्काळ उपचार व्हावेत.व सर्व नागरिक आरोग्य दृष्ट्या चांगले राहावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आमचे नेते महाराष्ट्राचे बुलंद नेतृत्व नामदार नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त हे महाआरोग्य शिबिर घेत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे यावेळी आयोजक श्री रमाकांत राऊत यांनी सांगितले.
या महाआरोग्य शिबिरात डोळ्यांच्या तपासणी,रक्ताच्या विविध तपासण्या,मुतखडा,प्रोस्टेट ग्रंथीचे आजार,लघवीचे आजार,हाडांचे विकार इत्यादीच्या तपासण्यात तज्ञ डॉक्टर कडून करण्यात आल्या.या शिबिराचा लाभ खारेपाटण पंचक्रोशीतील नागरिकांनी घेतला तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार श्री संतोष पाटणकर यांनी केले.

error: Content is protected !!