पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण विभागात करण्यात आले वृक्षारोपण

खारेपाटण शिवसेना पक्षाकडून खारेपाटण येथे वृक्षारोपणाचे आयोजन

आज दि. 23जून 2025 रोजी पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस.या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पक्षाकडून खारेपाटण विभागात वृक्षारोपण करण्यात आले.खारेपाटण रेल्वेस्टेशन रोड, कोंडवाडी, भागात हेवृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये जांभूळ,आंबा कलम, बेल आणि सोनचाफा अशी झाडे लावण्यात आली व याचे संपूर्ण संवर्धन करण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी घेतली असून वृक्षारोपणाचा संदेश देण्याचे काम शिवसैनिकांनी केला आहे.या उपक्रमावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख -मंगेश गुरव, विभाग प्रमुख -गुरुप्रसाद शिंदे, शहर प्रमुख -विश्वास राऊत, सचिन शिंदे व अन्य शिवसेनेचे कर्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!