पालकमंत्री नितेश राणे यांच्या उत्तम निरोगी दीर्घायुष्यासाठी खारेपाटण केदारेश्वर मंदिरात भाजपा पदाधिकाऱ्यांचे साकडे

महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी खारेपाटण भाजपा विभागाच्या वतीने खारेपाटण येथे असणाऱ्या केदारेश्वर मंदिरात एकत्र येऊन पालकमंत्री नितेश राणे यांच्या निरोगी दीर्घायुष्या साठी देवाकडे साकडे घालण्यात आले. यावेळी खारेपाटण सरपंच-प्राची इस्वलकर, उपसरपंच -महेंद्र गुरव,ग्रामपंचायत सदस्य -जयदीप देसाई, मनाली होनाळे,दक्षता सुतार,उज्वला चिके, भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख -सुधीर कुबल, शेखर शिंदे, ऋषी राऊत, ग्रामपंचायत कर्मचारी तेली व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य,पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.