पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिम्मित खारेपाटण येथे जिलेबी वाटप तसेच शेतकऱ्यांना वृक्षवाटप

खारेपाटण केदारेश्वर मंदिरा मध्ये दुधाभिषेक करून नितेश राणे यांच्या उत्तम व निरोगी दीर्घायुष्यासाठी भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची प्रार्थना
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त आज 23जून 2025रोजी सकाळी खारेपाटण भारतीय जनता पार्टी व ग्रामपंचायत खारेपाटण यांनी मिळून आज सकाळी आठ वाजता केदारेश्वर मंदिरा मध्ये दूधाभिषेक करून साहेबांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना करण्यात आली.व त्यानंतर खारेपाटण बस स्टॅन्ड वर केक कापून, पन्नास आंबा कलमांचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले,
वाढदिवसानिमित्त दहा किलो जिलेबी चे वाटप देखील यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच प्राची इसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव,शक्तिकेंद्र प्रमुख सुधीर कुबल,शेर्पे सरपंच-स्मिता पांचाळ, नडगिवे सरपंच-माधवी मण्यार, भाऊ राणे, जयदीप देसाई, मनाली होनाळे,उज्वला चिके,साधना धुमाळे, आरती गाठे,दक्षता सुतार,शेखर शिंदे, विजय सावंत, राजू चव्हाण, मोहन पगारे,इस्माईल मुकादम, सुधाकर ढेकणे, देवानंद इसवलकर व भारतीय जनता पार्टी चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.





