विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये शिक्षक प्रशिक्षण उत्साहात

सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल गरजेचा
युवक कल्याण संघ, कणकवली संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी , शिरवल-कणकवली
येथे शुक्रवार १३ जून २०२५ आणि शनिवार १४ जून २०२५ या दोन दिवसात अध्यापन पद्धतींमध्ये
सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार जुळवून घेण्यासाठी नुकताच डिजिटल युगात Gen-Z ला शिकविणे या विषयावर शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम (Faculty Development
Program – FDP) आयोजन करण्यात आला.
या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय वक्ते श्री. सचिन कुंभोजे व श्री. विश्वजीत काशीद यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी
डिजिटल युगातील अध्यापन, विद्यार्थी सहभाग वाढवण्याचे तंत्र, आणि आधुनिक शिक्षणतंत्राचा वापर यावर
सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय वक्ते श्री. सचिन कुंभोजे व श्री. विश्वजीत काशीद, संस्थेचे सचिव
डॉ. रमण बाणे ,खजिनदार श्री. मंदार सावंत, , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जगताप, उपप्राचार्य डॉ.
अमोल उबाळे, विभागप्रमुख श्री. अमर कुलकर्णी, यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सध्याच्या गरजेनुसार शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे असे मत सचिव डॉ. रमण बाणे यांनी व्यक्त
केले. तसेच विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असलेले विविध कार्यक्रम घेण्याचे आश्वासन खजिनदार
श्री. मंदार सावंत यांनी दिले . तसेच सध्याच्या विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून आपल्या शिक्षण पद्धतीत
बदल करणे गरजेचे आहे ही मानसिकता शिक्षकामध्ये यावी हा मूळ उद्देश हा कार्यक्रम घेण्यामागे आहे असे
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जगताप यांनी सांगितले.
या कार्यक्रमात ०६ महाविद्यालयातील एकूण ३१ प्राध्यापकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
मार्गदर्शनाबरोबर विविध मनोरंजक उपक्रम घेण्यात आले. चर्चासत्रांमध्ये सक्रिय सहभाग, अनुभवांची
देवाणघेवाण आणि वक्त्यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप उपप्राचार्य डॉ. अमोल तानाजी उबाळे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी
महाविद्यालयाच्या आधुनिक, विद्यार्थीकेंद्रित शिक्षणासाठी असलेल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.
युवक कल्याण संघाचे अध्यक्ष श्री. वैभवजी नाईक, उपाध्यक्षा सौ. स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे
आणि व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. मंदार सावंत यांनी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनासाठी
विशेष कौतुक केले.