कणकवली नगरपंचायत व कनकसिंधू शहर स्तर संघ, यांच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा

 आज जागतिक योग दिनानिमित्त कणकवली नगरपंचायत, कणकवली व कनकसिंधू शहर स्तर संघ, कणकवली यांच्यावतीने नगरवाचनालय हॉल येथे योग अभ्यास  करण्यात आला. "जेथे योग असे, तेथे रोग नसे" हा मंत्र घेत. प्रत्येकाने थोडा वेळ तरी योगा करावा व निरोगी राहावं असा संदेश देत. योग दिन साजरा करण्यात आला.  यावेळी योग प्रशिक्षक श्री आनंद सावंत यांनी उपस्थित महिलांना योगासनाचे विविधप्रकार दाखविले व आपल्या दैनंदिन जीवनात शरीराला होणारे फायदे सविस्तर सांगितले.
  यावेळी कार्यक्रमाला कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी  श्रीम. गौरी पाटील, योगप्रशिक्षक श्री.आनंद सावंत, कनकसिंधू शहर स्तर संघ अध्यक्ष श्रीम.प्रिया सरूडकर, स्वाती राणे व बचत गट महिला उपस्थित होत्या.
error: Content is protected !!