नांदगाव हायवेवर सापडलेली बॅग मालक डॉ. प्रमोद आपटे यांना सुपुर्द

नांदगाव सरपंच भाई मोरजकर, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांची समाधानकारक कामगिरी
देवगड येथील आपटे कुटुंबियांनी मानले दोघांचेही आभार
गोव्याहून देवगड येथे प्रवास करणारे डॉ. प्रमोद आपटे यांनी आपली बॅग बस मधून उतरले त्या नांदगाव तिठा हायवे ब्रिज वरील सर्व्हिस रोड लगत विसरून देवगड ला रवाना झाले मात्र ही बाब काही तासातच लक्षात येताच याबाबत लगत असलेल्या कुणकेरकर यांनी नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांना याबाबत माहिती दिली असता नांदगाव सरपंच भाई मोरजकर, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर, ऋषिकेश मोरजकर यांनी त्या ठिकाणी जात आधार कार्ड वरील मोबाईल वर संपर्क साधून त्यांच्या ताब्यात सदर बँग देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पणजी गोवा येथून डॉ. आपटे हे बस ने प्रवास करत असताना नांदगाव तिठा येथे बस थांबणार नसल्याने ते कोळंबा मंदिर समोरील ब्रिज वर उतरले व त्यांना न्यायला देवगड हुन कार घेऊन मुलगा येत असल्याने ते सर्व्हिस रोड वरील डिवायडर लगत बॅग ठेवत थांबले. नंतर त्यांची कार आली असता नजर चुकीने ती बॅग तिथेच राहिली .व ते देवगड ला निघाले . आज दुपारी २ च्या सुमारास एक बॅग असल्याचे लगत असलेल्या कुणकेरकर यांना दिसून येताच त्यांनी नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांना याबाबत दुरध्वनी व्दारे माहिती दिली असता त्या ठिकाणी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर, ऋषिकेश मोरजकर यांनी जात याबाबत कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप व बिट अंमलदार श्री चंद्रकांत झोरे यांना याबाबत माहिती दिली.
त्यांच्या सुचनेनुसार नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांच्या निवासस्थानी येत नांदगाव सरपंच भाई मोरजकर व पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांच्या समक्ष पत्ता किंवा नंबर मिळतो का ? हे पाहण्यासाठी सुटकेस उघडली असता त्या सुटकेस मध्ये आधार कार्ड व बँक खाते असलेले व कपडे आढळले ते आधार कार्ड डॉ.प्रमोद आपटे देवगड यांचे होते. व त्यावर मोबाईल नंबर असल्याने यावर संपर्क साधला असता. डॉ आपटे हे आपली सुटकेस शोधत पुन्हा देवगड हुन नांदगाव ला येतच होते. नांदगाव पोलीस पाटील यांच्या निवासस्थानी त्यांना त्यांच्या ताब्यात बॅग नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आली.
दोन्ही पेशाने डॉ असलेल्या आपटे यांनी नांदगाव सरपंच भाई मोरजकर व नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचे मनोमन आभार मानून असेच चांगले काम आपल्या हातून नियमितपणे घडत राहो. अशा शुभेच्छा ही दिल्या.तसेच कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांना ही आपल्याला बॅग मिळाली असल्याचे दुरध्वनी व्दारे सांगितले व त्यांचेही आभार मानले.