शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजुरीचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पत्र वितरीत

अपघाती मृत्यू झालेल्या तीन शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना मिळणार आर्थिक मदत
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दुर्दैवी घटनेत बळीराजाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला नियमानुसार मदत दिली जाते. या सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मंजुरी पत्रे वितरण करण्यात आली. यात शिवडाव येथील कृष्णा राजाराम करंगुटकर या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांना मदत देणारे पत्र वितरीत करण्यात आले.शेर्पे येथील तुषार शेलार यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याने तसेच करंजे येथील मंगेश बोभाटे यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसास मंजुरी पत्र देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रांत अधिकारी जगदीश कातकर, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, संतोष कानडे, मनोज रावराणे आदी उपस्थित होते.