लैंगीक अत्याचारप्रकरणी युवकाच्या आईवरही ऍट्रॉसिटीचा गुन्हा

युवकाच्या पोलीस कोठडीत वाढ

ऍड. रुपेश देसाई यांचा युक्तीवाद

लग्नाचे अमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर अनेकवेळा लैंगीक अत्याचार करतानाच तिच्याबाबत जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी अटक केलेला संशयित दीप उर्फ गोट्या तुकाराम खोचरे (२१, हरकुळ बु‌द्रुक – कावळेवाडी) याला पोलीस कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ केली. सरकारी पक्षातर्फे ऍड. रुपेश देसाई यांनी युक्तीवाद केला. दरम्यान सदर घटनेमध्ये संशयित दीप याची आई गायत्री तुकाराम खोचरे (रा. हरकुळ बुद्रुक) हिच्यावरही ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदरची घटना जानेवारी २०२५ ते ३ जून २०२५ या कालावधीत अनेकदा व वेगवेगळ्या ठिकाणी घडली आहे. फिर्यादीनुसार, संशयित दीप व पिडीत मुलगी हे स्नॅपचॅटवरून ओळख झाल्यानंतर एकमेकांशी चॅटिंग व मोबाईलवर बोलायचे. ११ फेब्रुवारीला रात्री १ वा. संश शयित दीप हा मुलीच्या घरी आला. त्याने मुलीशी तिच्या घराबाहेर अश्लिल वर्तन केले. २६ मार्चला तो मुलीला घेऊन समुद्रकिनारी असलेल्या हॉटेलमध्ये गेला. तेथे त्याने लग्नाचे अमिष दाखवून युवतीवर लैंगीक अत्याचार केला. हाच प्रकार त्याने १६एप्रिल व २३ मे रोजीसमुद्रकिनारी असलेल्या दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये केला. दरम्यान ३ जूनला पिडीत मुलीने दीप याला, ‘आपल्या नात्याबद्दल घरी समजले आहे. आपण लग्न कधी करणार?’, अशी विचारणा केली. मात्र, दीप याने, ‘तू मागासवर्गीय समाजातील असल्याने मी यापुढे तुझ्याशी संबंध ठेवणार नाही.’, असे सांगितले. तर त्याच दिवशी दीप याची आई गायत्री खोचरे हिने पिडितेचे घर गाठले व मुलीबाबत जातीवाचक वक्तव्य केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबात १० जूनला कणकवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दीप याला तात्काळ अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्याला गुरुवारी पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षातर्फे ऍड. रुपेश देसाई यांनी संशयित दीप याचा पूर्वइतिहास तपासणे, सदर कृत्याबाबात त्याने कुठे वाच्यता केली असल्यास त्याचा तपास करणे आदी कारणांसाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ व्हावी, असा युक्तीवाद केला. त्यानुसार न्यायालयाने दीप याच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.

error: Content is protected !!