जुन्या काळातील टेलर पॉल फर्नांडिस यांचे निधन

जुन्या काळातील नावाजलेले टेलर अशी होती ओळख
कणकवली शहरातील जुन्या काळातील नावाजलेले महापुरुष मंदिरा नजीक अनेक वर्ष आपला व्यवसाय सुरू केलेले टेलर पाॅल फर्नाडीस (वय ( 88 ) रा. फणसवाडी) यांचे आज रविवारी वृधापकाळाने निधन झाले .
जुन्या काळात अतीशय टापटीप राहणारे आणि नेहमी हसतमुख राहणारे कणकवलील एककमेव ड्रेस मेकर अतिशय सुंदर फीटींगचे कपडे शिवणारे नावाजलेले टेलर म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. टेलरिंग व्यवसायात त्यांनी आपल्या सोबत आपल्या समाज बांधवांना अन्य तरुणांना देखील प्रोत्साहन दिले. कणकवलीकरांना त्यानी टेलरिंग व्यवसायाच्या माध्यमातून सुमारे 60 वर्षाहून अधिक काळ सेवा दिली. कणकवलीत बँड पथक निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.