सुरेश केरकर यांचे वृद्धापकाळाने निधन

पावशी येथील रहिवासी जुन्या पिढीतील व्यापारी व प्रतिष्ठित नागरिक सुरेश उर्फ भाई भगवान केरकर (८०) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. पावशी येथील वाळू, खडी, चिऱ्याचे सप्लायर बाबा केरकर व शासकीय रेशन धान्य सप्लायर सचिन केरकर यांचे ते वडील होत.