भजन कलाकारांच्या हितासाठी “भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग” संस्थेची निर्मिती.

बुवा.संतोष कानडे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून एकमताने निवड.

भजनी कलाकारांच्या पाठीशी पूर्ण क्षमतेने उभा राहणार-बुवा संतोष कानडे.

कणकवली/प्रतिनिधी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकारांची सभा ही नुकतीच कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज मठ येथे संपन्न झाली.या सभेमध्ये जिल्ह्यातील भजनी कलाकारांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून सिंधुदुर्गातील भजनी कलाकार एकसंघ राहण्यासाठी जिल्हास्तरावर संस्था निर्माण करून तीचे बळकटीकरन करण्याची गरज असल्याचे एकमत उपस्थित भजनी कलाकारांचे झाल्यानंतर याविषयी चर्चा करून सर्वानुमते सुप्रसिद्ध भजनसम्राट भजनी बुवा.संतोष कानडे यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध भजनसम्राट बुवा.प्रकाश पारकर(कणकवली),बुवा ज्ञानदेव मेस्त्री(कुडाळ),नाईक धुरे बुवा(देवगड),खानोलकर सर यांची निवड करण्यात आली.संस्थेचे सचिव म्हणून बुवा श्री.गोपीनाथ लाड,सहसचिव पखवाजवादक श्री.हेमंत तवटे,सल्लागार म्हणून बुवा विजय परब,बुवा मारुती मेस्त्री,बुवा भालचंद्र केळुसकर,बुवा सदा कसालकर यांची निवड करण्यात आली.खजिनदार म्हणून सतीश रावराणे(वैभववाडी) आणि सह खजिनदार बुवा.मयूर ठाकूर(कणकवली) तसेच कार्यकारिणी सदस्य रितेश सुतार(वैभववाडी), संतोष मिराशी(कणकवली),नामदेव गिरकर(मालवण),दीपक पाळेकर(देवगड),लक्ष्मण बागवे (कणकवली) यांची निवड करण्यात आली.

       जरी आपण मला अध्यक्ष केलात तरी जिल्ह्यातील प्रत्येक भजनी बुवा हा या संस्थेचा अध्यक्ष आहे.मी या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक भजनी कलाकाराच्या पाठीशी खंबीर पने उभा राहीन.तसेच सर्वोतपरी प्रयत्न करून आपल्या भजन कलेला राजाश्रय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करिन असे मनोगत यावेळी अध्यक्ष संतोष कानडे बुवा यांनी व्यक्त केले.

कानडे बुवा यांचे अभिनंदन करीत असताना कोकणरत्न भजनी बुवा प्रकाश पारकर म्हणाले की,या संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्गात नवा आदर्श आम्ही घडवू.प्रत्येक भजनी कलाकारांना हेवा वाटेल असे संघटन निर्माण करून कौतुकास प्राप्त राहू.

अशाप्रकारे ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य भजनी कलाकार या सभेस उपस्थित होते.

error: Content is protected !!