संदेश पारकर यांच्या मातोश्री कै.उषा पारकर यांना शिवसेनेने वाहिली श्रद्धांजली

      शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री कै. उषा भास्कर पारकर यांचे रविवारी दुःखद निधन झाल्याने शिवसेनेच्या वतीने आज कणकवली शिवसेना शाखेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते कै. उषा पारकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. 
    यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, दिव्या साळगावकर, कणकवली तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, सचिन सावंत, उपतालुका प्रमुख महेश कोदे, शहरप्रमुख रुपेश नार्वेकर, तेजस राणे, प्रसाद अंधारी, विलास गुडेकर, चेतन मुंज, भिवा परब, प्रदीप सावंत, अजित काणेकर, जयेश धुमाळे,  पराग म्हापसेकर, योगेश मुंज, रवी खांदारे, प्रमोद पिळणकर, मज्जीद बटवाले,  राजा म्हसकर, इमाम नावळेकर, याकूब नावळेकर, अब्दुल नावळेकर,नितीन राऊळ, अरुण परब, लक्ष्मण हन्नीकोड, उत्तम सुद्रिक, मिलींद अहिर, रवी भंडारे, उद्धव पारकर आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!