कणकवलीत बाजारपेठेत साचलेल्या कचऱ्याचे ढीग तात्काळ उचलले

मुख्याधिकारी गौरी पाटील यांची सुट्टी दिवशी देखील कार्यतत्परता
बाजारपेठेतील नागरिकांमधून समाधान व्यक्त
कणकवली शहरात बाजारपेठे सहित अन्यत्र कचऱ्याचे ढीग साचल्या बाबत कोकण नाऊ चे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेत नगरपंचायत च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सुट्टी दिवशी तत्काळ कर्मचारी पाठवत हा कचरा साफ करून घेतला. कणकवली महापुरुष कॉम्प्लेक्स समोर साचलेला कचऱ्याचा ढीग तात्काळ हटवला गेल्याने या परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे. गेले दोन दिवस सलग आलेल्या शासकीय सुट्टी मुळे हा कचरा उचलला गेला नव्हता. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. बाजारपेठेत रहदारीच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र या बाबत मुख्याधिकारी पाटील यांचे या बाबत लक्ष वेधताच त्यांनी सुट्टी दिवशी देखील कर्मचारी पाठवत कचरा साफ करून घेतल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यतत्परते बद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली