पाकिस्तान वर भारताने केलेल्या हल्ल्याचा कणकवलीत जल्लोष

भारतीय सैनिकांच्या कामगिरीचे जल्लोष करत केले कौतुक
काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा बदला आज पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्ट्राइक करत घेण्यात आला. पाकिस्तान मधील 9 ठिकाणांवर दहशतवाद्यांवर जोरदार हल्ला करून प्रत्युत्तर दिले. या हल्ल्याच्या साठी भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांनी केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी कणकवली पटवर्धन चौक या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन फटाके लावत भारतीय ध्वज फडकवत जोरदार जल्लोष केला. भारताने दिलेल्या या प्रत्युत्तराचे स्वागत करत भारतीय जवानांचे देखील अभिनंदन केले. हा जल्लोष साजरा करत असताना सामाजिक कार्यकर्ते गौरव गवाणकर, राजू गवाणकर, नाना सापळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली