करूळ येथील हनुमान मंदिराचा जीर्णोध्दार रविवार 20 एप्रिल रोजी

विविध धार्मिक कार्यक्रमांचे करण्यात आले आहे आयोजन
कणकवली तालुक्यातील करूळ येथील जागृत हनुमान मंदिर जीर्णोध्दार सोहळा रविवार 20 एप्रिल रोजी सकाळी 6 वा . पासून आयोजित करण्यात आला आहे. करूळ चव्हाटा या ठिकाणी हा सोहळा होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांची आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 6 वाजता धार्मिक विधींना सुरुवात, दुपारी 12 वाजता आरती, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 4 वाजता सत्यनारायण महापूजा, सायंकाळी 6 वाजता तीर्थप्रसाद, रात्री 8 वाजता स्थानिक भजने, रात्री 9.30 वाजता समई नृत्य तरी या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.