सिंधुदुर्ग जिल्हा शिंदे शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक रविवार 20 एप्रिल रोजी

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे करणार मार्गदर्शन
कणकवली, देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (शिंदे गट) या पक्षाची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी दुपारी ३.०० वाजता शिवशक्ती मंगल कार्यालय, कणकवली रेल्वे स्टेशन नजीक पार पडणार असून, या बैठकीसाठी कणकवली देवगड वैभववाडी या मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती रहावे, असे आवाहन शिवसेना पक्षाचे उपनेते संजय आग्रे यांनी केले आहे.