कणकवलीत वरचीवाडी येथे प्लॅस्टिक ला आग लागून इमारत गाळ्याचे नुकसान

कणकवली माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड यांची तात्काळ घटनास्थळी धाव

कणकवली नगरपंचायत च्या अग्निशमन बंबाद्वारे आग आटोक्यात

कणकवली शहरात नरडवे रस्त्यावर डेगवेकर बागेजवळ गुरुप्रसाद राणे यांच्या दोन दुकान गाळ्यांच्या लगत प्लास्टिक च्या भंगार साहित्याला लागलेल्या आगीत गुरुप्रसाद राणे यांच्या गाळ्याच्या बाहेरील काही भागाचे नुकसान झाले. या आगीत दुकान गाळ्यांच्या मीटर जळून खाक झाला. तर तेथे असलेली एक जुन्या दुचाकीला देखील आगीची झळ बसली. ही घटना आज शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळतात माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नगरपंचायतच्या बंबाला बोलावून नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली.
कणकवलीत वरचीवाडी या ठिकाणी डेगवेकर बागेनजीक प्रस्तावित सीएनजी पंप असलेल्या गुरुप्रसाद राणे यांच्या मालकीच्या दोन दुकान गाळ्यांच्या बाहेर एका भंगार व्यावसायिकाला ही जागा दिली होती. या गाळ्याच्या बाहेरील बाजूस प्लॅस्टिकचे भंगार साहित्य टाकलेले होते. माळरानावरून लागत आलेली आग दुपारच्या सत्रात या प्लॅस्टिकला लागली. व आगीचा एकच मोठा भडका उडाला. अखेर माजी नगराध्यक्ष श्री. गायकवाड यांच्या प्रयत्नातून नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमुळे या गाळ्यांचे नुकसान झाले आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!