ठाकरे सेनेचे उपतालुकाप्रमुख राजू रावराणे यांचा भाजपमध्ये प्रवेश

मंत्री ना.नितेश राणे यांनी भाजपा पक्षात केले स्वागत

कणकवली येथील लोरे नं.१ येथील ठाकरे सेनेचे उपतालुकाप्रमुख राजू रावराणे यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केला. तसेच उबाठाचे सत्यविजय रावराणे, दिलीप हनुमंतराव रावराणे, नारायण तेली, बाळा रावराणे, उत्तम राणे यांनी ही भाजपाचा झेंडा हाती घेतला.

कॅबिनेट मंत्री ना. नितेश राणे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्ष प्रवेशामुळे फोंडाघाट येथे उरली सुरली उबाठा सेना संपुष्टात आली आहे. यावेळी मंत्री ना. नितेश राणे, बबन हळदिवे, आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!